Sujay Vikhe advising father Radhakrishna Vikhe Patil on stage during the Rahuri meeting, sparking laughter among party workers. Saam Tv
Video

वाहनात बसणाऱ्यांपासून सावध राहा; मुलगा सुजय यांचा मंचावरूनच वडील राधाकृष्ण विखे पाटलांना सल्ला|VIDEO

Maharashtra Politics: राहुरीतील मेळाव्यात सुजय विखे यांनी वडील राधाकृष्ण विखे पाटील यांना मंचावरूनच सल्ला दिला. विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्या लोकांपासून सावध राहा. या विनोदी संवादामुळे विखे पिता-पुत्रांच्या जुगलबंदीची चर्चा रंगली आहे.

Omkar Sonawane

विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्या लोकांपासून सावध रहा असा सल्ला माजी खासदार सुजय विखे यांनी वडील राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलाय. तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सुजय यांच्या सल्ल्यावर प्रतिक्रिया दिलीये. मी सहसा गाडीत कुणाला घेत नाही, मात्र कार्यकर्ते ज्यावेळी गाडीत बसतात त्यावेळी आपले कान पक्के ठेवले पाहिजे असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे विखे पिता पुत्राच्या जुगलबंदीची चांगलीच चर्चा होत आहे.

राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर मुलगा अक्षय कर्डिले याला विधानसभेची उमेदवारी द्यावी यासाठी कर्डिले समर्थकांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे, नगरचे आमदार संग्राम जगताप, अक्षय कर्डिले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाषणादरम्यान सुजय विखे यांनी अक्षय कर्डिलेसह वडील राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील सल्ला देताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. गाडीत बसणारे कार्यकर्ते सर्वात घातक प्राणी असतात. नेत्याच्या गाडीत बसायला जो घाई करतो तो लावालावी केल्याशिवाय उतरत नाही. त्यामुळे विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्या कार्यकर्त्यांपासून सावध राहिले पाहिजे असा सल्ला सुजय विखेंनी भर मंचावर दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shweta Tiwari Photos: लाल चोळी अन् पिवळी साडी, श्वेता तिवारीचं सौंदर्य पाहून तरूणाई झाली घायाळ

Maharashtra Live News Update: मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गोदावरीची आरती

Celebrity Divorce: ४ वर्षात सुखी संसार मोडला! बिस बॉस फेम कपल होणार वेगळे? चाहत्यांना मोठा धक्का

Bhopla Recipe : हिवाळ्यात आवर्जून बनवा भोपळ्याचा 'हा' चटपटीत पदार्थ, संध्याकाळच्या चहाची रंगत वाढेल

EPFO: नोकरी सोडली, PF काढायचाय? तर त्याआधी हे काम कराच; अन्यथा येतील अडचणी

SCROLL FOR NEXT