Sudhakar Badgujar saam tv
Video

Sudhakar Badgujar: आमदार सीमा हिरेंसह स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून सुधाकर बडगुजरांचा भाजप प्रवेश|VIDEO

Maharashtra Political News: ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेले नेते सुधाकर बडगुजर यांचा आज मुंबईत भाजप प्रवेश सोहळा पार पडला.

Omkar Sonawane

ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेले नेते सुधाकर बडगुजर यांचा आज मुंबईत भाजप प्रवेश झाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे यावेळी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर पक्षात माझ्यासह दहा ते बारा जण नाराज आहेत, असे जाहीर वक्तव्य केल्यानंतर त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती.

बडगुजर हे भाजपमध्ये जातील अशी चर्चा सुरू असताना नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन बडगुजर यांच्यावरील गुन्ह्यांची जंत्रीच वाचून दाखवली होती. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पत्रव्यवहार करत बडगुजर यांना पक्षात प्रवेश देऊ नये अशी मागणी केली होती. मात्र आमदार सीमा हिरेंच्या विरोधाला डावलून आज सुधाकर बडगुजर यांनी कमळ हाती घेतले आहे. त्यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक आणि शहराच्या माजी महापौरांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटाला नाशिकमध्ये सुरुंग लागल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT