jalna news  saam tv
Video

Jalna News: वादळी वाऱ्याचा कहर जालना जिल्ह्यात शेतकऱ्याच्या घराचे पत्रे उडाले; पाहा व्हिडिओ

Heavy Winds Hit Jalna Village: जालन्यातील धारकल्याण शिवारात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

Omkar Sonawane

अक्षय शिंदे, साम टीव्ही

जालना जिल्ह्यातील धारकल्याण शिवारात काल (७ जून) सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने कहर केला. जोरदार वाऱ्याच्या झोतासह झालेल्या पावसामुळे धारकल्याण येथील शेतकरी रंगनाथ भुतेकर यांच्या घरावरील पत्रे उडाली असून, त्यांच्या संपूर्ण संसारावर संकट कोसळले आहे.

या पावसामुळे भुतेकर यांच्या घरातील साठवलेले अन्नधान्य, संसारोपयोगी वस्तू तसेच दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. घरावरचे छत उडाल्याने सध्या त्यांचा संपूर्ण संसार उघड्यावर आला आहे.विशेष म्हणजे, सध्या खरीप हंगामाची पेरणी सुरू होण्याचा काळ असून, अशा वेळी घराचे छप्पर उडाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

रंगनाथ भुतेकर यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. अन्यथा येणाऱ्या काळात शेतकरी कुटुंबाला मोठ्या संकटांचा सामना करावा लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT