Firefighters battling a massive blaze at a double-storey building in South Mumbai’s Marine Lines area after two gas cylinders exploded. Saam Tv
Video

दोन सिलिंडरचा स्फोट आणि संपूर्ण इमारतीला आग; पाहा VIDEO

Marine Lines Fire: दक्षिण मुंबईतील मरीन लाईन्स परिसरात दुमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला.

Omkar Sonawane

दक्षिण मुंबईतील मरीन लाईन्स परिसरात आज दुपारी एका दुमजली इमारतीला भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आग इतकी भयानक होती की काहीवेळातच संपूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी पडली.

प्राथमिक माहितीनुसार, आगीत दोन गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून त्यामुळे परिसर हादरला. सुदैवाने अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले होते.

या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, बेस्टचे वीज कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. आगीच्या ठिकाणी अजूनही काही लोक अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून बचावकार्य सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: मध्य रेल्वेवर मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

SCROLL FOR NEXT