Earthquake  Saam Tv News
Video

Earthquake : अमेरिकेत शक्तीशाली भूकंप, ८ रिश्टर स्केलची तीव्रता, त्सुनामीचा इशारा

Earthquake in USA : दक्षिण अमेरिकेतील ड्रेक पॅसेज परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ८ रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली.

Namdeo Kumbhar

दक्षिण अमेरिकेतील ड्रेक पॅसेज परिसरात भूकंपाचे तीव्र हादरे जाणावले आहेत. भूकंपाची तीव्रता 8 रिश्टर स्केल असल्याचे समोर आलेय. या शक्तिशाली भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. यूएसजीएसच्या माहितीनुसार, भूकंप 10.8 किलोमीटर खोलीवर झाला.

शुक्रवारी दुपारी 4:16 वाजता (HST) ड्रेक पॅसेजमध्ये 8.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, अशी माहिती यूएस त्सुनामी प्रणालीने दिली. भूकंपाचा केंद्रबिंदू सुमारे 36 किलोमीटर खोलीवर होता. दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोक आणि अंटार्क्टिका यांच्यामध्ये वसलेला ड्रेक पॅसेज हा त्याच्या भूगर्भीय रचनेमुळे भूकंपीय क्रियाकलापांसाठी ओळखला जातो. भूकंपाची तीव्रता जास्त असूनही, हवाई प्रशासनाने पुष्टी केली की बेटावर त्सुनामीचा कोणताही धोका नाही. भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळील पॅसिफिक क्षेत्रात सुनामीचा धोका असू शकतो, परंतु सध्या दूरच्या भागांसाठी कोणतीही चेतावणी जारी करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा सोनं ३२०० रुपयांनी स्वस्त; वाचा आजचे दर

IND vs BAN: बांग्लादेशाविरूद्ध बुमराहला टीममधून वगळणार? 'या' गोलंदाजाला मिळू शकते संधी, वाचा प्लेईंग 11

Jio Recherge Offer: जिओचा खास प्लॅन, नेटफ्लिक्ससह १०० जीबी हाय-स्पीड डेटा अन् बरंच काही...

Mumbai Local Train: रेल्वेचा मास्टरप्लान! आता दर ३ मिनिटांनी धावणार मुंबई लोकल

Maharashtra Live News Update: मेट्रो दोन तासांपासून खोळंबली, मुंबईकरांची कोंडी

SCROLL FOR NEXT