Solapur women prepare traditional snacks like chivda, chakli, bhakri, and chutney for men leaving for the Maratha reservation rally in Mumbai. Saam Tv
Video

Maratha Aarakshan: चिवडा, चटणी, चकली, भाकरी...मराठा आरक्षण आंदोलकांसाठी घराघरात तयारी | VIDEO

Women preparing food for Maratha Reservation Rally: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या आंदोलकांसाठी सोलापूरात महिलांनी चिवडा, चकली, भाकरी, चटणीसारख्या पदार्थांची खास तयारी केली आहे. पुरुष मंडळींच्या प्रवासासाठी घराघरात डबे बांधताना महिलांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले.

Omkar Sonawane

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने मोठ्या रॅलीसह रवाना झाले आहेत. या आंदोलनाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, घराघरातून पुरुष मंडळी मोठ्या संख्येने मुंबईकडे निघत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापूरात महिलांची लगबग पाहायला मिळत आहे. घरातील पुरुष मंडळी उपाशीपोटी प्रवासाला निघू नयेत यासाठी महिला चिवडा, चकली, शेंगाच्या पोळ्या, कडक भाकरी, शेंगाची चटणी अशा खास पदार्थांची मेजवानी बांधून देत आहेत. न्याहारीसोबत दीर्घ प्रवासासाठी लागणारा डबा तयार करण्याचं काम देखील महिलांनी हाती घेतलंय. मात्र या तयारीसोबत घरातील पुरुष मंडळी मुंबईला निघत असल्याने महिलांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. एका बाजूला आंदोलनासाठीचा उत्साह तर दुसऱ्या बाजूला कुटुंबियांना सोडताना आलेलं भावूक वातावरण अशी दुहेरी परिस्थिती प्रत्येक घराघरात पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा एकच इशारा; नंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार-खासदारांनी लावली रांग

Maratha reservation: मनोज जरांगेंना अवघ्या 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी, काय आहेत न्यायालयाच्या अटी

Tariff War: पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन मोडवर! ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात आखला 'स्पेशल ४०'चा प्लॅन

Raj And Uddhav Thackeray Meets: तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर, ठाकरे बंधूंच्या भेटीचा राजकीय अर्थ काय?

Maharashtra Live News Update: पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर कारने घेतला पेट

SCROLL FOR NEXT