Solapur rains wreak havoc: Autorickshaw driver swept away near Puna Naka, rescue operation underway Saam Tv
Video

Solapur Rain: सोलापुरात मुसळधार पाऊस; रिक्षाचालक गेला वाहून |VIDEO

Midnight Downpour in Solapur: सोलापुरात मुसळधार पावसामुळे पुना नाका परिसरात रिक्षाचालक नाल्यात वाहून गेला. अग्निशामक दलाकडून बेपत्ता रिक्षाचालकाचा शोध सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Omkar Sonawane

सोलापूर : शनिवारी मध्यरात्री शहरात मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळील पुना नाका परिसरात पावसाचे पाणी नाल्यांमध्ये प्रचंड वेगाने वाहत होते. याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश सुनील शिंदे (वय 36) हा रिक्षाचालक पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न करत असताना नाल्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. रात्रीच्या वेळी अचानक वाढलेल्या पाण्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जाते.

घटनेची माहिती मिळताच सोलापूर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून वाहून गेलेल्या रिक्षाचालकाचा शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मुसळधार पावसामुळे नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दशावतार चित्रपटात दाखवलेला कोकणातील राखणदार नक्की कोण? त्याचं वैशिष्ट्य काय?

Earthquake News: आसाममध्ये 5.9 तीव्रतेचा भूकंप, घाबरून नागरिक घराबाहेर

'सर माझी पाठ दुखतेय' सुट्टीचा मेसेज टाकला अन् १० मिनिटांत कर्मचाऱ्याचा मृत्यू, बॉसची पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीवर शासन दरबारी सकारात्मक विचार सुरू

Infertility Issue: जास्त तणावामुळे वंध्यत्वाची समस्या होते का?

SCROLL FOR NEXT