Solapur Rain SAAM TV
Video

Solapur Rain : चांदणी नदीला महापूर, ५ गावांचा संपर्क तुटला, बार्शी तालुक्यात भयानक पूरस्थिती | VIDEO

Heavy Overnight Rainfall In Agalgaon : सोलापूरच्या आगळगावात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने चांदणी नदीला महापूर आला असून, ९ तासांपासून उत्तर बार्शी तालुक्याचा ५ गावांशी संपर्क तुटला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर जिल्ह्यातील आगळगाव परिसरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला महापूर आला आहे. तब्बल नऊ तासांपासून उत्तर बार्शी तालुक्याचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. आगळगावातील नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांना रात्रभर जागून काढावी लागली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे उडीद, कांदा आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. चांदणी नदीला आलेल्या महापुरामुळे मांडेगाव, खडकलगाव, धसपिंपळगाव, देवगाव आणि कांदलगाव या गावांचा बार्शी तालुक्याशी संपर्क तुटला आहे. नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं जात आहे. मुसळधार पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara : फॉलोवर्स वाढविण्यासाठी सोशल मीडियावर अनोखी जाहिरात; महिलांची दुकानात गर्दी, दुकान मालकावर गुन्हा दाखल

दुर्दैवी! अतिवृष्टीने नुकसान झाल्याने टोकाचे पाऊल, लातूरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीस उद्या पुरग्रस्त भागाची पाहणी करणार

Health Tips: उपवास असल्यास व्यायाम करावा की नाही?

म्हाडाचं घर घेताय? अर्ज करण्यापूर्वी ५ गोष्टी हमखास चेक करा, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप

SCROLL FOR NEXT