Snake spotted inside moving Pune-Danapur Express S2 coach Saam Tv
Video

धावत्या एक्स्प्रेसमध्ये घुसला साप! प्रवाशांची पळापळ|VIDEO

Snake Spotted Inside Moving Pune-Danapur Express S2 Coach: पुणे-दानापूर एक्सप्रेसच्या S2 बोगीत चालत्या ट्रेनमध्ये अचानक साप आढळल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. खबरदारी म्हणून दौंड कॉर्ड लाईन स्थानकावर ट्रेन थांबवून बोगी रिकामी करण्यात आली.

Omkar Sonawane

मंगेश कचरे, साम टीव्ही

पुणे रेल्वे स्थानकातून दानापूरच्या दिशेने निघालेल्या पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. धावत्या एक्सप्रेसच्या S2 बोगीमध्ये अचानक साप आढळून आल्याने प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. गाडी क्रमांक 01449 मध्ये हा प्रकार घडला. साप दिसताच प्रवाशांनी प्रसंगावधान राखत रेल्वे प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ट्रेन दौंड कॉर्ड लाईन स्थानकावर थांबवण्यात आली. S2 बोगी तात्काळ पूर्णपणे रिकामी करण्यात आली.

सापामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत रेल्वे प्रशासनाकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. या घटनेनंतर दानापूर एक्सप्रेस दौंड कॉर्ड लाईन रेल्वे स्थानकावर गेल्या तासाभरापासून थांबवून ठेवण्यात आल्याची माहिती आहे. चालत्या एक्सप्रेसच्या बोगीत थेट साप आढळून आल्याने रेल्वेच्या प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. साप बोगीत नेमका कसा आला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT