Scene from Sinnar where a supporter of the NCP (Ajit Pawar faction) was attacked with spray during polling; clash captured on video. Saam Tv
Video

सिन्नरमध्ये मतदानावेळी वाद; अजित पवारांच्या उमेदवाराच्या समर्थकावर स्प्रे हल्ला, २ गटात तुफान हाणामारी|VIDEO

Spray Attack On NCP Ajit Pawar Supporter In Sinnar: सिन्नरमध्ये मतदानादरम्यान राष्ट्रवादी अजित दादा गटाच्या उमेदवाराच्या समर्थकावर स्प्रेने हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Omkar Sonawane

नाशिक: येथील सिन्नरमध्ये मतदानादरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराच्या समर्थकावर स्प्रेने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या हल्ल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला असून सोशल मीडियावर तो व्हायरल झाला आहे. हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या पोलिसांनी तपास सुरू केला असून घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मतदानादरम्यान किरकोळ वाद वाढत जाऊन दोन्ही गट आमनेसामने आले. त्याचवेळी एका समर्थकावर स्प्रेने हल्ला करण्यात आला. घटनेनंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सिन्नरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकमेकांच्या विरोधात लढत आहे. सिन्नर हा मंत्री माणिकराव कोकाटे यांचा बालेकिल्ला असून अनेक वर्षांपासून ते तेथून निवडून येतात. तसेच सोमवारी (1डिसेंबर) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी सभा घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

Skin Care: १० रुपयांच्या व्हॅसलीनने होतात हे फायदे; महागड्या केमिकल क्रिमची कधीच लागणार नाही गरज

Wednesday Horoscope : महत्त्वाची वार्ता कानी पडणार; ५ राशींच्या लोकांसाठी बुधवार गेमचेंजर ठरणार

Wednesday Horoscope: पैशाला वाटा फुटतील, कटकटी संपणार नाहीत; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Prajkta Wedding: मालिकेतील येसूबाईंचा खऱ्या आयुष्यातील शुंभराजसोबत विवाह संपन्न,पाहा प्राजक्ताच्या लग्नाचे सुंदर PHOTO

SCROLL FOR NEXT