Sindhudurg Saam Tv News
Video

Sindhudurg: सिंधुदुर्गच्या शिरोडा वेळागर समुद्रात ७ जण बुडाले, दुसऱ्या दिवशी सर्व पर्यटकांचे मृतदेह सापडले

Sindhudurg News: सिंधुदुर्गमध्ये पर्यटनासाठी आलेल्या ७ जणांसोबत भयंकर घडलं. शिरोडा वेळागर समुद्रात पोहताना हे पर्यटक बुडाले. या सर्वांचे मृतेदह सापडले आहेत.

Priya More

सिंधुदुर्गमधील शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या सातही पर्यटकांचे मृतदेह सापडले आहेत. पाच मृतदेह हाती लागल्यानंतर शनिवारपासून दोघांचा शोध सुरू होता. आता काही वेळापूर्वी सहावा मृतदेह वेंगुर्ला येथील कालावी बंदर येथे सापडून आला. बेळगावमध्ये राहणारे इरफान मोहम्मद इसाक लोंढा यांचा कालवीबंदर येथे मृतदेह सापडला. तर कुडाळमधील जाकीर निसार मणियार यांचा सातवा मृतदेह वेंगुर्ले समुद्रात सापडला.

बेळगाव आणि कुडाळ येथील ९ पर्यटक शिरोडा वेळागर समुद्रात ३ ऑक्टोबरला फिरण्यासाठी आले होते. समुद्रामध्ये पोहत असताना हे पर्यटक बुडाले होते. त्यातील दोघांना वाचविण्यात यश आले होते. तर तिघांचे मृतदेह मच्छीमारांनी बाहेर काढले होते. तर यातील चार पर्यटकांचा शोध सुरू होता. या सातही पर्यटकांचे मृतदेह आता हाती लागल्यानंतर आता शोधकार्य थांबविण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राज्यातील राजकारणात भूकंप होणार; राष्ट्रवादी अन् शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीची नांदी

Ghevda Bhaji Recipe: गावरान पद्धतीची घेवड्याची सुकी भाजी कशी बनवायची?

Pune : पुण्यात भेट द्यायलाच हवी अशी 5 पर्यटन स्थळे, नक्की फिरायला जा

Fraud Alert : दुबई काय नी टांझानिया काय; कुठं कुठं फिरवलं, पुण्यातील व्यापाऱ्याला ३.७९ कोटींना लुटलं, मास्टरमाईंडचा गेम

Papaya Benefits: थंडीत पपई खाल्ल्याने होतात हे आरोग्यदायी फायदे, आठवड्यातून २ दिवस नक्की खा

SCROLL FOR NEXT