Nashik Ganpati Visarjan SaamTv
Video

Nashik News : विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव !

ShivTandav : नाशिकच्या विसर्जन मिरवणुकीत शंकरासह महाबली हनुमान यांच्या अनोख्या नृत्याचे सादरीकरण शिवतांडवमधून करण्यात आले.

Saam Tv

आज मुबई, पुण्यासह राज्यभरात गणपती बाप्पाला भाविक साश्रूनयांनी निरोप देत आहेत. दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज, मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. नाशिक येथे देखील गणपती विसर्जन मिरवणूक आकर्षण ठरत आहे. पारंपरिक ढोल - ताशाच्या वाद्यांसह विविध पारंपरिक नृत्य देखील सादर करण्यात येत आहेत. यावेळी विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य सादर करण्यात आले. या शिवतांडव नृत्याने गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले. शिवसेना युवक मित्र मंडळाने हा अनोखा नृत्य प्रयोग केला. दरवर्षी शिवसेना युवक मित्र मंडळाकडून वेगवेगळ्या आकर्षक नृत्याचा उपक्रम राबवला जातो. यात शंकरासह महाबली हनुमान यांच्या अनोख्या नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. हरियाणाच्या कलाकारांनी केलेल्या या अघोरी नृत्यामुळे नाशिकचा विसर्जन मिरवणूक महामार्ग कमालीचा गजबजून गेला होता. यावेळी नाशिककरांनी हा नृत्यप्रकार बघण्यासाठी एकच गर्दी केलेली दिसली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kokan Nagar Govinda 10 Thar: एकावर एक थर रचत कोकण नगर गोविंदा पथकाने रचला इतिहास, १० थरांची दिली कडक सलामी; पाहा फोटो

Maharashtra Live News Update: बारवी धरण 'ओव्हरफ्लो', धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

Maharashtra Rain Update : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर; पुढील ५ दिवस कसं असेल वातावरण? जाणून घ्या

Money Saving Tips : या 5 गोष्टी तुम्ही चुकूनही खरेदी करु नयेत

मुंबईत गोविंदाचा मृत्यू, तोल गेला अन् खाली कोसळला; सणाला गालबोट

SCROLL FOR NEXT