Sanjay Raut News AI Image
Video

Sanjay Raut : ५ हजारांची मदत पुरेशी आहे का? फडणवीसांच्या दिवाळी सेलिब्रेशनवर राऊतांचा थेट हल्लाबोल

Maharashtra Political Sanjay Raut News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. पाच हजारांच्या मदतीवर सवाल उपस्थित करत सरकारवर टीका.

Alisha Khedekar

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री यंदा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करत आहेत. सरकारच्या या उपक्रमाचे स्वागत करत खासदार संजय राऊत यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष्य केले आहे. केवळ एक दिवस शेतकऱ्यांच्या घरी जाऊन फराळ केल्याने त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली. तसेच महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्यासह अन्य मंत्र्यांनीही शेतकऱ्यांच्या घरी भेटी दिल्या. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, राज्यातील शेतकरी दुष्काळ आणि आर्थिक संकटामुळे अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाणे चांगले आहे. मात्र, त्यांना मिळालेली पाच हजार रुपयांची मदत पुरेशी आहे का, याची विचारणा मंत्र्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून करावी.

शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी त्यांच्या शेतात जाऊन परिस्थिती पाहणे आवश्यक आहे. सरकारने केवळ औपचारिक कार्यक्रम न करता शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय घ्यावेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार असल्याच्या मुद्द्यावरही राऊत यांनी टीका केली. सैनिकांसोबत दिवाळी साजरी केल्याने चीनची घुसखोरी किंवा पुलवामा आणि पहलगामसारख्या घटना थांबत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकरी आणि सैनिकांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष कृती होणे गरजेचे असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Intake By Age: वयानुसार रोज किती पाणी पिणे योग्य? जाणून घ्या तुमच्या शरीराला नेमकं किती पाणी पिण्याची गरज

Maharashtra News Live Update: मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास AI कॅमेऱ्याची नजर

Turmeric Tea : ७ दिवस सकाळी हळदीचा चहा प्यायल्याने काय होते? ५ वा फायदा वाचून आश्चर्यचकित व्हाल

दिवाळीच्या दिवशीच भाजपवर शोककळा! दिग्गज आमदाराचे निधन; मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

Gold Price Today : दिवाळीआधी सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर! आठवडाभरात किती महागलं सोनं? पाहा २२, २४ कॅरेटचे भाव

SCROLL FOR NEXT