बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र, मृत्युंजय गायकवाड यांचा काल बुलढाण्यात वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. काल रात्री झालेल्या या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी भल्या मोठ्या तलवारीने स्टेजवर केक कापला व कापलेला केक तलवारीनेच आपल्या सुविध्य पत्नी यांना भरविला. या सर्व कार्यक्रमाचा व्हिडिओ समाज माध्यमात आता जोरदार व्हायरल होत आहे. सामान्य व्यक्तीने तलवारीने केक कापल्यास त्या व्यक्तीवर आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल होतो, मात्र आता शिंदेंच्या शिलेदाराने तलवारीने केक कापून त्यास तलवारीने आपल्या सुविध्य पत्नी पूजा गायकवाड व मुलांना केक भरवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावर बुलढाणा पोलीस काय कारवाई करतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान याच विषयी आमदार संजय गायकवाड यांनी साम टीव्हीसोबत बातचीत केली आहे, यावर बोलताना मी काहीही चूक केली नाही असं स्पष्टपणे आमदार गायकवाडांनी सांगितले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.