Minister Shivendra Raje discussing Satara Gazette details with officials in Pune. Saam Tv
Video

शिवेंद्रराजे यांनी सातारा गॅझेटवर केला खुलासा; म्हणाले... VIDEO

Pune Meeting Satara Gazette Details: पुण्यातील बैठकीत बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा गॅझेटवर स्पष्टीकरण दिले. उप समिती अध्यक्ष विखे पाटील यांनी आयुक्तांकडून माहिती घेण्याचे निर्देश दिले होते, मात्र सदस्यांना स्वतंत्र माहिती घेण्याचा अधिकार नाही. असे म्हणत त्यांनी यावर अधिकचे बोलणे टाळले.

Omkar Sonawane

पुणे: सातारा गॅझेट संदर्भात पुण्यात आज एका माहितीपूर्ण चर्चेसाठी बैठक पार पडली. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित या बैठकीत बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते. यावेळी पुरातत्व शास्त्रज्ञही उपस्थित राहून गॅझेटसंबंधित तांत्रिक माहिती दिली.

बैठकीनंतर शिवेंद्रराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला आज या विषयावर कोणतीही अधिकृत निर्णय घेणारी बैठक झालेली नाही. उप समितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी आयुक्तांकडून काही माहिती घेण्याचे निर्देश दिले होते, इतर बैठका पुनर्वसन संदर्भात होत्या, मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांना अधिकार आहेत, मात्र सदस्यांना स्वतंत्र माहिती घेण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले. मंत्री शिवेंद्रराजे यांनीही गॅझेटवर इतर प्रश्नांसंदर्भात काढता पाय घेतल्याचे दिसून आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाण्याच्या सुभेदारीवरुन नाईक-शिंदे भिडले; शिंदे-भाजपसाठी ठाणे महत्वाचं का? वाचा

WhatsAppमध्ये आधार कार्ड डाउनलोड करण्याची सोपी ट्रिक

Maharashtra Teachers : शिक्षकांसाठी मोठी बातमी; हजारो शिक्षकांना मिळणार नव्या वेतनश्रेणीचे प्रमाणपत्र

Maharashtra Police: मोठी बातमी ! वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही पोलीस भरतीत संधी, आदेश जारी

Govind Barge Case: 'मेरे पास तेरे जैसे चार', माजी उपसरपंच आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT