Shivsena Sambhajinagar Rada Saam TV
Video

Shivsena vs BJP: छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान राडा, ठाकरे गट अन् भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी, पाहा VIDEO

UBT Shivsena vs BJP Sambhajinagar Rada Political Chaos: छत्रपती संभाजीनगर शहरात तुफान राडा झाला. शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाली.

डॉ. माधव सावरगावे

Shivsena vs BJP Partyworkers Fight: छत्रपती संभाजीनगर शहरात तुफान राडा झाला. शिवसेना ठाकरे गट आणि भाजपचे पदाधिकारी पदाधिकारी अचानक आमने-सामने आले. यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी करण्यात आली. वाद इतका विकोपाला गेला. की दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले.

यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, पोलिसांनी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना वेळीच ताब्यात घेतल्याने तणाव शांत झाला. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला होता.

छत्रपती संभाजीनगरामध्ये आज तिसऱ्या दिवशी सलग पॉलिटिकल राडा पाहायला मिळाला. रविवारी पंतप्रधान मोदी विमानतळावर आले तर त्यांचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला उत्तर म्हणून आज भाजपकडून आदित्य ठाकरे यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन आले.

आदित्य ठाकरे हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये थांबले होते. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हॉटेलसमोर धडकले. त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली. आदित्य ठाकरेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करताच शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला. आमदार अंबादास दानवे भाजप पदाधिकाऱ्यांवर धावून गेले.

त्यामुळे क्षणार्धात दोन्ही गटात हाणामारी सुरु झाली. दोन्ही गटांमध्ये सुरु झालेला वाद सोडवताना पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली. सध्या पोलिसांनी भाजप आणि ठाकरे गटातील काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. सध्या परिसरात तणावपूर्व शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Maharashtra Live News Update: उत्तर प्रदेश सरकारच्या कृत्याविरोधात मालेगावात पडसाद

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टीचं सेवन करताना दिसतंय? तर ठरतं शुभ संकेत

SCROLL FOR NEXT