rahul gandhi saam tv
Video

MVA Clash: महाविकास आघाडीत फूट? ठाकरे गटाच्या नेत्याकडून राहुल गांधींना तोंडाला काळ फासण्याचा इशारा|VIDEO

Savarkar Jayanti Sparks Political Row : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहूल गांधी हे अनेकवेळा वादग्रस्त विधान करत असतात यामुळे ठाकरे गट आणि कॉँग्रेस पक्षात तणाव देखील निर्माण झाला होता.

Omkar Sonawane

शिवसेना ठाकरे गट आणि कॉँग्रेस पक्षात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे, याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नाशिकचे उपमहानगरप्रमुख बाळा दराडे यांनी एक पोस्ट शेअर केली आणि या पोस्टमुळे कॉँग्रेस आणि ठाकरे गटात मोठा वाद होण्याची शक्यता आहे. कॉँग्रेसचे जेष्ठ नेते राहुल गांधी अनेकवेळा सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करत आले आहे.

यामुळे अनेकवेळा ठाकरे गट आणि कॉँग्रेसमध्ये वाद पाहायला मिळाला. ठाकरे गटाचे नाशिकमधील नेते बाळा दराडे यांनी राहुल गांधी यांना आक्रमक इशारा दिला आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल अपशब्द वापरले तर ते नाशिकला आल्यावर त्यांच्या तोंडाला काळं फासू, काळं फासता आले नाही तर त्यांच्यावर दगडफेक करू, असा गंभीर इशारा बाळा दराडे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT