Shiv Sena ministers boycott the cabinet meeting and head to meet Deputy CM Devendra Fadnavis over ‘Operation Lotus’ concerns. Saam Tv
Video

Maharashtra Politics: शिंदेंच्या शिवसेनेचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार; नाराज मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला|VIDEO

Shiv Sena Ministers Skip Cabinet: शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजपच्या ऑपरेशन लोटसविरोधात नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. भेटीसाठी मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचले असून, हा तणाव महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वळण आणतोय.

Omkar Sonawane

शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसमुळे नाराज होऊन शिंदेंच्या शिवसेना मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदेंशिवाय एकही शिवसेना नेता मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्हता. ठाण्यासह राज्यात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू आहे, अनेक शिवसेना नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचे समोर आले. त्यामुळेच मंत्र्यांकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारल्यानंतर शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहचले आहे. भाजपात होणारे पक्षप्रवेश आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना मंत्र्यांनी रविंद्र चव्हाण यांच्यावर नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावण्याचं काम रविंद्र चव्हाण करत असल्याचीही तक्रार शिवसेना नेत्यांकडून कऱण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत आणि अजित पवार समर्थकांमध्ये दगडफेक|VIDEO

Maharashtra Live News Update: सोळा वर्षीय भाचीला मामाने ट्रेनमधून ढकललं; अल्पवयीन भाचीचा मृत्यू

Veg Fried Rice Recipe: घरच्या घरी बनवा हॉटेस सारखा व्हेज फ्राईड राईस, सोपी आहे रेसिपी

Maharashtra Politics : राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी; महायुतीत भूकंप

भेटायला बोलावून फिरायला नेलं, नंतर धावत्या कारमध्ये अल्पवयीन मुलीच्या शरीराचे लचके तोडले

SCROLL FOR NEXT