Sushma Andhare breaks down emotionally during Shiv Sena’s 60th anniversary event in Mumbai. saam tv
Video

शिवसेनेच्या वर्धापन दिनी भावनांचा बांध फुटला; सुषमा अंधारेंना रडू कोसळले|VIDEO

Sushma Andhare Emotional Video At Shiv Sena Anniversary: शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे आणि शिंदे गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी सुषमा अंधारे भावूक होऊन रडू कोसळल्याचा क्षण चर्चेचा विषय ठरला.

Omkar Sonawane

शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा होत असून, खासदार फुटीनंतर प्रथमच दोन्ही गट स्वतंत्रपणे शक्तिप्रदर्शन करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरेसेनेचा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडत आहे. या कार्यक्रमासाठी पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली असून, खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित झाले असून, शिंदेसेनेकडून भव्य शक्तिप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, ठाकरेसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या कार्यक्रमादरम्यान भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाल्याने उपस्थितांमध्येही भावनिक वातावरण निर्माण झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT