Shivneri Shiv Jayanti Utsav Saam Tv
Video

Shiv Jayanti: शिवनेरीवर शिवजन्मोत्सव थाटामाटात साजरा, शिवकन्यांनी गायला पाळणा; पाहा VIDEO

Shiv Jayanti Celebrated Grandly at Shivneri Fort: शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

Priya More

छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्याठिकाणी जन्म झाला त्या पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी ५ पारंपारिक पोषाखातील शिवकन्यांनी पाळणा गायला. जन्मोत्सवाच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आशिष शेलार यांनी देखील पाळणा हलवला. यावेळी शिवरायांची जन्मखोली विविध रंगाच्या फुलमाळांनी सजवण्यात आली होती.

दगडी बांधकामात असेलली शिवरायांची जन्मभूमी खूपच आकर्षक दिसत होती. या जन्मखोलीमध्ये बालशिवबा यांचा पाळणा देखील लावण्यात आला होता. या जन्मसोहळ्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या जन्मसोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातून मोठ्यासंख्येने शिवभक्त महिला, तरुण-तरुणी पारंपारिक पोषाखामध्ये उपस्थित होते. शिवजन्मोत्सव साजरा होत असताना छत्रपती शिवाजी महाराजाच्या पोषाखात चिमुकले शिवबा देखील पाहायला मिळाले. शिवजन्मोत्सव साजरा झाल्यानंतर मर्दानी खेळ, पारंपारिक नृत्य, पारंपारिक वाद्य वाजविण्यात आली. पोवाडे देखील गाण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या सैन्य दलाने सलामी देखील दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT