Shirdi News SaamTv
Video

Shirdi Crime News : दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरलं; साई संस्थानच्या २ कर्मचाऱ्यांनी गमावला जीव | Video

Shirdi Crime News Updates : शिर्डीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून सोमवारी शिर्डीच्या तीन वेगवेगळ्या भागात तिघांवर प्राणघातक हल्ले करण्यात आलेले आहे. यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Saam Tv

दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरलं असून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करण्यात आलेले आहेत. यात दोघांची हत्या झालेली आहे. तर अन्य एक गंभीर जखमी आहे. पहाटेच्या सुमारास ड्यूटीवर जात असताना तिघांवर अज्ञाताने चाकूने वार केला. या तिन्ही घटना शिर्डीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या. मात्र या तिन्ही घटनांमुळे शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे. तर कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेले बघायला मिळत आहे. हा हल्ला का झाला याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे.

सोमवारी पहाटे झालेल्या या हल्ल्यात साई संस्थानच्या २ कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. या दुहेरी हत्याकांडाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तर हल्ला झालेला तिसरा इसम हा खासगी कर्मचारी होता. तो देखील ड्यूटीवर जात होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर लोणीच्या प्रवारा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिर्डीत गुन्हेगारीने डोकं वर काढलेलं बघायला मिळत आहे. त्याचीच परिणीती आज बघायला मिळाली आहे. साई संस्थानचे २ कर्मचारी पहाटे ड्यूटीवर जात असताना त्यांच्यावर वेगवेगळ्या भागांमध्ये प्राणघातक हल्ला झाला. या घटनांचे सिसिटीव्ही फुटेज देखील मिळाले आहेत. दरम्यान, या प्रकाराने शिर्डीत खळबळ उडाली आहे. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी शिर्डीत दाखल झालेले आहेत. तसच माजी खासदार सुजय विखे पाटील हे देखील तातडीने शिर्डीत दाखल झालेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Gondia Travel: मुंबईवरून गोंदियाला प्रवास करणार आहात? जाणून घ्या रेल्वे, बस आणि विमानाचे सर्व पर्याय

IND vs AUS: काय ही फालतूगिरी? वारंवार पावसाचा व्यत्यय, फक्त ३२-३२ ओव्हर्सचा सामना, काय आहे नियम?

Maharashtra Live News Update : पुढचा कार्यक्रम ३ वाजता समजेल- राज ठाकरे

Musician Passes Away: जगप्रसिद्ध संगीतकाराचे निधन; वयाच्या ४८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

Jui Gadkari Photos: "तुला पाहता आजही, हासते या मनी चांदणे" जुई गडकरीचं फोटोशूट चर्चेत

SCROLL FOR NEXT