Devendra Fadnavis SaamTv
Video

Devendra Fadnavis : .. ते माधवाच्या भूमिकेत होते म्हणूनच विजय झाला, फडणवीसांकडून मोदींना माधवाची उपमा

BJP Shirdi Convention : शिर्डीत आज भाजपचे महाअधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आदी प्रमुख पदाधिकारी नेते उपस्थित होते.

Saam Tv

ज्या प्रकारे महाभारताचं युद्ध पांडवांना केशव आणि माधवामुळे जिंकता आलं. त्याच प्रकारे आम्हालाही हे निवडणुकीचं युद्ध केशवाची भूमिका पार पाडणाऱ्या मतदारांमुळे आणि माधवाची भूमिका निभावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जिंकता आलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी यांना माधवाची उपमा दिली आहे. शिर्डी येथे आज पार पडलेल्या भाजपच्या महाअधिवेशनात उपस्थितांना संबोधताना ते बोलत होते.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, भाजपसाठी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र महत्वाचा आहे. ज्यांना श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत बुरी झाली. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भाजपला विजय मिळाला आहे. त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना साष्टांग दंडवत करतो. आपले सर्वांचे आभार माणण्यासाठी हे अधिवेशन आज घेतलं आहे. चाणक्य म्हणतात की राजा बनायचं हे सुखी बनण्याचा मार्ग नाही आहे. राजा होणं म्हणजे जनतेची सेवा करणं आहे. तसंच आपल्यालाही हे शासन सुखासीन होण्यासाठी मिळालेलं नाही. राज्यकर्ते म्हणून आमची आणि संघटन म्हणून तुमची जबाबदारी आता जनतेला सुखी करण्याची आहे. जिंकलो म्हणून सुखासीन झालो, थांबलो तर हा जनतेने आपल्याला दिलेल्या कौलासोबत द्रोह असेल, असंही यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Almond Jaggery Puran Poli Recipe : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ- लुसलुशीत पुरणपोळी

SCROLL FOR NEXT