Sanjay Gaikwad SaamTv
Video

Sanjay Gaikwad : 'त्यांचे मेळावे म्हणजे रडगाणं'; संजय गायकवाडांनी ठाकरेंवर साधला निशाणा

ShindeSena Dasara Melava Update : शिंदे सेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. यावेळी संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

ठाकरे गटाचा दसरा मेळावा म्हणजे फक्त रडगाणं असल्याची टीका शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी केली आहे. आज आझाद मैदानात शिंदेसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. तर दुसरीकडे शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून दसरा मेळावा घेण्यात येत आहे. या दोन्ही मेळाव्यांची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. यावेळी आझाद मैदानावर शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचा मेळावा म्हणजे फक्त रडगाणं आहे असं म्हंटलं आहे. ''आम्ही अनेक वर्षांपासून शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी येतो. त्यात आम्ही कडवट हिंदुत्वाचे विचार आम्हाला एकायला मिळायचे. मात्र आता त्यांच्या मेळाव्यात हिंदुत्वाचे विचार नसतात. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन त्यांनी बाळसाहेबांचे विचार सोडले आहे. त्यांचा मेळावा हा फक्त रडगाणं असतो.'' अशी टीका गायकवाड यांनी केली आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत 100 जागांवर दावा केल्याचं देखील गायकवाड यांनी म्हंटल आहे. 100 जागा मागू आणि 90 जागांवर जिंकून येऊ असं यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT