Varsha Gaikwad News SaamTv
Video

Video : महिला मुख्यमंत्री पदावरून शिरसाट आणि गायकवाड यांच्यात जुंपली !

Maharashtra Politics News : महिला मुख्यमंत्रीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि शिंदे गटामध्ये चांगलाच वाद जुंपलेला बघायला मिळत आहे.

Saam Tv

महिला मुख्यमंत्रीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि शिंदे गटामध्ये चांगलाच वाद जुंपलेला बघायला मिळत आहे. महिला मुख्यमंत्री झाल्यास तुम्हाला आवडेल का? या प्रश्नावर 'माझं उत्तर हो असेल', असं काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हंटल आहे. आता त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टोला लगावला आहे. 'त्यांच्या मनात काँग्रेसचा मुख्यमंत्री बनू नये असं असावं' अशी खोचक टीका शिरसाट यांनी केली आहे. त्यामुळे आता शिंदे गट आणि काँग्रेसमध्ये महिला मुख्यमंत्रीपदाचा नवा वाद बघायला मिळत आहे.

खासदार वर्षा गायकवाड यांना माध्यमांनी मंगळवारी महाविकास आघाडीमधून महिला मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार कोण असतील, तुमच्या डोळ्यासमोर कोणते चेहरे आहेत? असा प्रश्न केला होता. त्यावर उत्तर देताना राष्ट्रवादीतून सुप्रिया सुळे तसेच शिवसेनेतून रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार आहेत, मला मुख्यमंत्री म्हणून महिला असेल तर आवडेल, असं उत्तर गायकवाड यांनी दिलं होतं. आता वर्षा गायकवाड यांच्या या विधानाने भाजप मात्र आक्रमक झाले आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी या सर्व प्रकरणात वर्षा गायकवाड यांना टोला लगावला आहे. 'वर्षा गायकवाड यांच्या मनात काँग्रेसचा मुख्यमंत्री बनू नये असं असावं. त्यांनी सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांची नावं घेतली आहेत. कदाचित काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासोबत त्यांचे काही अंतर्गत वाद असतील त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार मुख्यमंत्री होऊ नये असं त्यांना वाटत असेल.' असा पलटवार शिरसाट यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manifestation : मॅनिफेस्टेशन करणे म्हणजे काय ? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: - सांगली जिल्हा बँक संचालक आणि अधिकाऱ्यांना नोटिस

Shocking: बॉयफ्रेंडसोबत मिळवून नवऱ्याला मारलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनखाली गाडले; तिथेच जेवण बनवून जेवायची बायको

Shocking News : बॉलिंग केल्यानंतर पाणी प्यायला अन् जागीच कोसळला, क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूचा मृत्यू

Voting Documents: या पुराव्यांशिवाय तुम्ही मदतान करू शकणार नाही! वाचा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT