मुंबई : पवार घराण्यातील द्वंद्वामुळे लोकसभेप्रमाणे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील वातावरण सुरुवातीलाच प्रचंड तापले आहे. कारण, आता स्वत: शरद पवार यांनी त्यांची नेहमीची चाकोरी सोडून अजित पवार यांची नक्कल केलीये, बारामतीमधील सभेत मंगळवारी अजित पवारांनी पवारांना लक्ष्य केलं होतं. मोठ्या साहेबांनी माझं घर फोडलं असं म्हणायचं का ? असा सवाल अजितदादांनी केला होता. याच वक्तव्याला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय...
महाराष्ट्राच्या राजकारणात अभेद्य कूटुंब म्हणून ओळखलं जाणाऱ्या पवार कुटुंब का फुटलं ? कुणी फोडलं हा प्रश्न कायम आहे...मुळात पवारांना कमकुवत करायचं असेल तर दादांना त्यांच्यापासून दूर करणं हा एकमेव अजेंडा दिल्लीश्वरांचा होता. त्यातून मग दादांना कधी गोंजारण्यात आलं तर कधी धमकवण्यात आलं असं बोललं जातं..लोकसभेनंतर आता पुन्हा विधानसभेच्या मैदानात पवार विरुद्ध पवार सामना रंगणार आहे.. बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगेल..त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही संपूर्ण राज्याचं लक्ष बारामतीकडे असणार आहे. लोकसभेला ताई अन् विधानसभेला दादा असं सुत्र कायम राहणार की यंदा बारामतीकर युगेंद्र पवारांच्या रुपानं शरद पवारांच्या पाठीशी उभे राहणार हेच पाहायचं. यंदाची ही निवडणूक राजकीय गणितं कायमची बदलणारी ठरणार असं बोललं जातंय. त्यातून कधीकाळी एकसंध असलेल्या पवार घराण्यात दरी वाढतचं चाललीये एवढं नक्की...
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.