ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर रोजी आहे. हिंदू मान्यतेनुसार, सूर्यग्रहणाचा काळ अशुभ मानला जातो. या काळात पूजा आणि शुभ कार्य करण्यास मनाई आहे. परंतु, काही काम करणे अत्यंत शुभ मानली जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणाच्या वेळी केलेले दान सामान्य दिवसांमध्ये केलेल्या दानापेक्षा अनेक पटीने जास्त पवित्र असते.
गूळ सूर्याचे प्रतीक मानले जाते. गूळ दान केल्याने जीवनात प्रगती होते.
वास्तुशास्त्रानुसार तांबे हा सूर्याचा धातू आहे. ते दान केल्याने सूर्य ग्रह मजबूत होतो आणि आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात.
असे मानले जाते की लाल रंग सूर्याला खूप प्रिय आहे. गरीब आणि गरजूंना लाल वस्त्र दान केल्याने आत्मविश्वास आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढते.
धार्मिक श्रद्धेनुसार, ज्यांच्या कुंडलीत राहू-केतू किंवा शनि कमकुवत आहे त्यांच्यासाठी हे दान फायदेशीर आहे. यामुळे नकारात्मक प्रभाव कमी होतो.
अन्नदान हे महादान मानले जाते. ग्रहणानंतर तांदूळ, डाळ किंवा इतर अन्नपदार्थांचे दान केल्याने पुण्य मिळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.