sharad pawar Saam tv
Video

Sharad Pawar: शरद पवारांची प्रकृती कशी आहे?, नेमकं काय झालं? रोहित पवार म्हणाले...

Sharad Pawar Health Update: शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रोहित पवारांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी सांगितले.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर सध्या पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत. शरद पवार यांच्यासोबत त्यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे या देखील आहेत. त्यानंतर रोहित पवार हे देखील रुबी हॉल क्लिनिकला आले त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत शरद पवार यांच्या प्रकृतीबाबचे महत्वाची माहिती सांगितले. रोहित पवार म्हणाले की, 'सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की अजिबात हॉस्पिटलला येऊ नका. पवारसाहेबांची प्रकृती नॉर्मल आहेत. ते आयसीयूमध्ये नाहीत. एका प्रायव्हेट रुममध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मी स्वत: त्याच्याशी चर्च करून आलो आहे. त्यामुळे घाबरण्यासारखं आणि कोणतेही टेन्शन घेण्यासारखं अजिबात नाही.'

तंसच, 'शरद पवारांना फिजिकल स्ट्रेस आला आहे. गेल्या १२-१३ दिवसांत पवारसाहेब स्वत: बऱ्याच ठिकाणी जात होते आणि लोकांना भेटत होते. त्यामुळे थोडासा स्ट्रेस आला आहे. कफ थोड्या प्रमाणात झाला आहे. पुढच्या थोड्या वेळात रिपोर्ट येतील. इथेच एक- दोन दिवस त्यांना ठेवले जाईल. त्यानंतर त्यांच्याच प्रायव्हेट कारने त्यांना मुंबईला नेले जाईल. इतर पेशंटच्या हितासाठी इते कुणीही गर्दी करू नये. पवारसाहेबांना कुणालाही भेटता येणार नाही. हॉस्पिटलचा प्रोटोकॉल योग्य पद्धतीने फॉलो केला पाहिजे असे आमच्या सर्वांचे मत आहे.', असे देखील रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT