Sharad Pawar Health Update Saam Tv
Video

Health Update : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट, डॉक्टरांनी काय सांगितलं?

Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

Namdeo Kumbhar

Sharad Pawar Health Update : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खोकला आणि श्वसनाच्या त्रासामुळे (Respiratory Infection) त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांची प्रकृती स्थिर (Stable) आहे.

प्रकृतीत पुरेशी सुधारणा झाल्यामुळे त्यांना आज ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे आणि ते लवकरच घरी परतणार आहेत.

मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम आणि खासदार संजय राऊत यांच्यासह प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनीही रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीचा सस्पेन्स अखेर संपला

MPSC Recruitment : मोठी बातमी! MPSC च्या विद्यार्थ्यांना दिवाळी भेट; १६७१७ पदांसाठी भरती

Maharashtra Forts : मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक! महाराष्ट्रातील ७ अभेद्य किल्ले, शत्रूला जिंकणे होतं कठीण

IND vs NZ : भारताने पुन्हा नाणेफेक जिंकली; प्रथम फलंदाजी कोण करणार? पाहा प्लेईंग ११

Actor Threat Case : बॉलिवूड सेलिब्रिटींना धमकी देणाऱ्या आयटी इंजिनिअरला अटक, चौकशीत धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT