Sharad Pawar news Saam tv
Video

राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार? शरद पवार गटाच्या नेत्यांची गुप्त बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

maharashtra political news : राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शरद पवार गटाच्या नेत्यांची गुप्त बैठक झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत. आजारपणातून बरे झाल्यानंतर राजकीय नेत्यांनी त्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. शरद पवारांनंतर पक्षातील नेते अॅक्टिव्ह झाले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये बैठक पार पडल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत मिळत आहेत. शरद पवार गटाच्या नेत्यांच्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT