Shruti Vilas Kadam
एक चमचा ताजे कोरफडीचे जेल आणि अर्धा चमचा व्हॅसलिन एकत्र मिसळा. चेहरा स्वच्छ धुवून हे मिश्रण हलक्या हाताने लावा.
हिवाळ्यात किंवा सतत एसीमध्ये राहिल्याने त्वचा कोरडी पडत असेल तर हे मिश्रण प्रभावी ठरू शकते.
नियमित वापरामुळे त्वचेचा निस्तेजपणा कमी होऊन चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसू लागतो.
कोरफडीतील शांत करणारे गुणधर्म आणि व्हॅसलिनचे संरक्षणात्मक आवरण त्वचेला आराम देण्यास मदत करतात.
झोपण्यापूर्वी हे मिश्रण लावल्यास त्वचेला रात्रभर पोषण मिळते आणि सकाळी त्वचा अधिक मऊ वाटते.
कोरफड त्वचेला हायड्रेट करते, तर व्हॅसलिन त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार राहते.
नियमित वापर केल्यास त्वचेतील कोरडेपणा कमी होऊन त्वचा अधिक निरोगी आणि हायड्रेटेड दिसू शकते.