Bhatsa Dam gates opened in Shahapur after heavy rainfall, roads submerged and villages cut off Saam Tv
Video

शहापूरला पावसाचा तडाखा! भातसा धरणाचे ५ दरवाजे उघडताच जलप्रलयाचे रौद्ररूप|VIDEO

Heavy Rainfall In Shahapur Cutting: शहापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे भातसा धरणाचे ५ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे ४० गावांचा संपर्क तुटला असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Omkar Sonawane

शहापूर तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भातसा धरणाचे तब्बल पाच दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले आहेत.

धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे शहापूर–सापगाव–किन्हवली रस्त्यावरचा पूल पाण्याखाली गेला असून, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे या मार्गावरील सुमारे ४० गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, भातसा नदीतील पाणी सापगावात शिरल्याने गावातील मोठा परिसर पाण्याखाली गेला आहे. परिस्थिती गंभीर बनू नये म्हणून महसूल विभागाचे अधिकारी व जीवरक्षक पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: पाठलाग करत गचांडी पकडली अन्...; बीडमधील पत्रकाराच्या मुलाच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News Update : धुळे जिल्ह्यात पावसाचा कहर

Thane Rain update : ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट; NDRFची टीम सतर्क, जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

Asia Cup 2025 : एक चूक अन् टीम इंडियाचा पराभव निश्चित! IND vs Pak मध्ये भारताला 'ही' गोष्ट करावी लागेल फॉलो

Thane Rain : जिल्ह्यात पावसाची संततधार, ठाणे–कल्याण महामार्ग ठप्प, रायतेपूल पाण्याखाली

SCROLL FOR NEXT