DB Ozone Building near Thakur Mall, Mira Road – Site where elderly man and his daughter were attacked over pigeon feeding dispute Saam Tv
Video

कबुतरांना दाणे टाकण्यास विरोध केल्याने राडा; वृद्धासहित मुलीवर रॉडने हल्ला,VIDEO

Violent Assault in Mira Road: मीरा रोड येथे कबुतरांना दाणे टाकण्यास विरोध केल्याने ६९ वर्षीय वृद्ध आणि त्यांच्या मुलीवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

कबुतरांना दाणे टाकण्यास अटकाव केल्याने झालेल्या वादातून एका वृद्ध नागरिक व त्यांच्या मुलीवर लोखंडी रॉडने जबरी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाकूर मॉलजवळील डीबी ओझोन इमारतीत राहणारे महेंद्र पटेल (६९) रविवारी सकाळी दूध आणण्यासाठी गेले असता, हा प्रकार घडला. महेंद्र पटेल यांनी परिसरात कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांना असं करू नका, असे सांगितल्याने वाद निर्माण झाला आणि चार आरोपींनी लोखंडी रॉडने महेंद्र पटेल आणि त्यांच्या मुलीवर हल्ला केला. महिलेला गळा दाबून मारहाण करण्यात आली.

या प्रकरणी भाईंदर येथील काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करत तपास सुरू केला आहे.

कबुतरांची विष्ठा, पिसे आदींमुळे आजार वाढण्याचा धोका असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी कबुतरखान्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, तरीही अनेक ठिकाणी कबुतरांना खुलेआम दाणे टाकले जात असल्याने नागरिकांमध्ये अशा घटनांमुळे अस्वस्थता निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हवामान खात्याच्या येल्लो अलर्टनंतर नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस

Suger-Free Modak Recipe: साखरेशिवाय बनवा स्वादिष्ट मोदक, जाणून घ्या सोपी रेसिपी

गणपतीसाठी गावी निघालेलं कुटुंब अचानक बेपत्ता, ४० तासांनी सापडलं, समोर आल्यानंतर त्यांनी घटनाक्रमच सांगितला | VIDEO

Janhvi Kapoor: जान्हवी कपूर लाल साडीत खुललं सौंदर्य, फोटोंवर लागल्या नजरा

Shocking : पत्नीला मारलं, नंतर पोलिसांना गुंगारा दिला, पण चिमुकलीनं आरोपी बापाचं पितळ उघडं पाडलं, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT