Phaltan female doctor suicide case latest update 2025 : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टराच्या आत्महत्येने महाराष्ट्रात खळबळ उडाली. पीएसआय अन् घरमालकाच्या नाव लिहून महिला डॉक्टरने आयुष्याचा दोर कापला होता. बलात्काराचा अन् मानसिक छळ केल्याचा आरोपाने महाराष्ट्र हादरले. या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका आरोपीला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत. (Satara police search for absconding PSI in doctor death case)
मित्राच्या फार्महाऊसवर लपून बसलेल्या प्रशांत बनकर याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पण प्रमुख आरोपी अलेला पीएसआय गोपाल बदने मात्र अद्याप फरार आहे. आरोपीच्या शोधासाठी सातारा पोलिसांची चार पथके रवाना झालेली आहेत. PSI बदने फरारच असून त्याचा शोध घेतला जातोय. दरम्यान, गोपाल बदने यांनी महिला डॉक्टरावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्याशिवाय फलटणमधील विद्यानगर येथे राहत असणाऱ्या घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यानेही चार महिने मानसिक छळ केल्याचे महिला डॉक्टराने आत्महत्या करण्याआधी लिहिले. (PSI Badne accused of rape in Satara doctor case)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.