Police detaining the accused youth in Satara after a dramatic knife attack attempt on a minor schoolgirl. Saam Tv
Video

Satara News: सातारलं हादरलं! एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न|VIDEO

Knife Attack Attempt On Schoolgirl: सातारा शहरातील करंजे परिसरात एका माथेफिरू युवकाने एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीवर चाकू लावून हल्ल्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून पोलिसांनी मुलीचा जीव वाचवला आणि आरोपीस ताब्यात घेतले.

Omkar Sonawane

ओंकार कदम, साम टीव्ही

सातारा शहरातील बसाप्पा पेठ करंजे परिसरात एका शालेय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून तिच्या गळ्याला चाकू लावून एका माथेफिरू प्रेमवीराने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या सर्व घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

शेजारी लोकांनी युवकाचे समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता संबंधित माथेफिरू युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याच्या हातात चाकू असल्याने युवतीच्या जीवास धोका असल्याचे ओळखून सातारा शहर पोलीस ठाण्याचे गोपनीय पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत शिफतीने युवकास ताब्यात घेतले. यावेळी जमावाने संबंधित युवकाची चांगलीच धुलाई केली. संबंधित युवकाकडून याआधी देखील पीडित मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न झाला होता. सध्या या युवकाला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bomb Blast: 11 आरोपी निर्दोष,मग बॉम्बस्फोट कुणी केले?

Political Clash: छावा विरुद्ध राष्ट्रवादी, महाराष्ट्रात वाद पेटला

Pune Crime : मुलाने प्रॉपर्टीसाठी छळ करायची सीमा गाठली; आईला वृद्धाश्रमात धाडलं, बहिणीला मनोरुग्णालयात, पुण्यातील प्रकार

Manikrao Kokate: रमी खेळणं कृषीमंत्र्यांना भोवणार? वाचाळवीर कोकाटेंचं मंत्रिपद जाणार?

Jagdeep Dhankhad Resign : मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा, कारणही समोर

SCROLL FOR NEXT