Satara Chhatrapati Dahi Handi 2025 highlights Saam TV News Marathi
Video

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

SATARA DAHI HANDI 2025: उदयनराजे भोसले यांनी अचानक एन्ट्री केली. ते बाहेरगावी असताना अचानक कार्यक्रमात आले आणि हटके स्टाईलमध्ये कॉलर उडवत कार्यकर्त्यांची मने जिंकली.

Namdeo Kumbhar

  • साताऱ्यातील तालीम संघ मैदानावर छत्रपती दहीहंडी सोहळा जल्लोषात पार पडला.

  • सांगलीच्या शिवनेरी गोविंदा पथकाने ७ थर रचून ४.४४ लाख रुपयांची दहीहंडी फोडली.

  • खासदार उदयनराजे भोसले अचानक कार्यक्रमात हजर झाले आणि कॉलर उडवून कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले.

  • भाषणात त्यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांचा उल्लेख करून जातपात न मानण्याचा संदेश दिला.

साताऱ्यातील तालीम संघ मैदानावर छत्रपती दहीहंडी सोहळा पार पडला. छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने शिवानीताई कळसकर यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी सोहळ्यात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील गोविंदा पथके सहभागी झाली होती. यामध्ये सांगलीतल्या तासगाव येथील शिवनेरी गोविंदा पथकाने 7 थर रचत यावर्षीची 4 लाख 44 हजार 444 रुपयांची दहीहंडी फोडून हे बक्षीस जिंकले. यावेळी मोठ्या संख्येने साताऱ्यातील छत्रपती उदयनराजे भोसले यांचे चाहते या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमात उदयनराजे बाहेरगावी असताना देखील अचानक त्यांची एन्ट्री झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जातपात मानली नाही, आणि मी देखील जातपत मानत नाही. तुमचे आणि माझे एकच रक्त असल्याचे म्हटले.

तू मोठा, मी लहान असा म्हणायचा अधिकार कोणालाही दिलेला नाही. अपघात झाल्यावर ब्लड देताना कोणी जात-पात बघत नाही.ज्यांनी जातपात मांडली ती स्वतःच्या स्वार्थासाठी असे म्हणत त्यांनी हटके स्टाईलने कॉलर उडवत कार्यकर्त्यांची मने जिंकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Urfi Javed: डोळ्याखाली जखम, चेहऱ्यावर रक्त; उर्फी जावेदची अशी का झाली अवस्था ? चाहते चिंतेत

७५ वर्षीय वृद्धेचे अब्रुचे लचके तोडले, झोपडपट्टीत घुसून तरूणाकडून जबरदस्ती, परिसरात खळबळ

Driving School: ड्रायव्हिंग शिकण्यासाठी सर्वोत्तम शाळा कशी निवडावी? अर्ज करण्याचे स्टेप-बाय-स्टेप टिप्स

Mumbai Rain : मानखुर्दमध्ये पावसाचे तांडव, रस्त्यांवर नदी, कमरेइतके पाणी, नागरिकांची कसरत

SCROLL FOR NEXT