Jejuri Saam TV
Video

Jejuri : जेजुरीत शैव-वैष्णवांचा संगम, माऊलींच्या पालखीचं भंडारा उधळत स्वागत | VIDEO

Mauli Palkhi in Jejuri जेजुरी नगरीमध्ये शैव आणि वैष्णवांचा मेळा पहायला मिळाला आहे. आज माऊलींची पालखी जेजुरीतून प्रस्थान ठेवून वाल्हे गावात मुक्कामी असणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जेजुरी - शैव आणि वैष्णव परंपरेचा अद्वितीय संगम खंडेरायाच्या जेजुरी नगरीत पाहायला मिळाला आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे जेजुरीत आगमन होताच, संपूर्ण वातावरण भंडाऱ्याच्या उधळणीने उजळून निघालं आहे. माऊलींच्या स्वागतासाठी वारकरी, भाविक, आणि स्थानिकांनी जल्लोषात सहभाग घेतला होता.'ज्ञानोबा-तुकोबांच्या नामघोषाने' गगनात भरारी घेतलेली दिसत होती. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा दिव्य सोहळा होता. माऊलींच्या पालखी आगमनाने जेजुरी नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं.

आज माऊलींची पालखी जेजुरीतून प्रस्थान ठेवून वाल्हे गावात मुक्कामी असणार आहे. पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या रांगा, टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेला सोहळा हा अध्यात्म आणि एकात्मतेचा जिवंत अनुभव देणारा ठरतोय.प्रशासनाकडून योग्य ती व्यवस्था करण्यात आली असून, भाविकांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Maharashtra Rain Update : राज्यात पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा | VIDEO

Railway Recruitment: खुशखबर! रेल्वेत नोकरीची संधी; ११४९ रिक्त जागांवर भरती; आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT