SANT TUKARAM MAHARAJ PALAKHI REACHES PUNE WITH GRAND FLORAL WELCOME DURING ASHADHI WARI saam tv
Video

Ashadh Wari: पुण्यात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे भक्तिभावात स्वागत; हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी|VIDEO

पुण्यात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत भक्तिभावाने स्वागत करण्यात आलं. हजारो भाविकांच्या उपस्थितीत टाळ-मृदंगाच्या गजरात पुणे शहर भक्तिरसात न्हावून निघालं

Omkar Sonawane

आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात मोठ्या भक्तिभावात दाखल झाली. पालखी आगमनानंतर पुणेकरांनी उत्साहात स्वागत करत भक्तीमय वातावरण निर्माण केलं. संचेती चौकात दिंडीवर विशेष हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली, ज्यामुळे परिसर भक्तिरसात न्हावून गेला.

वारकरी दिंडीमध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते. टाळ- मृदंगाच्या गजरात, अभंगगायन करत संत तुकाराम महाराजांचा जयघोष करण्यात येत होता. पुण्यातील विविध भागांमधून नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून पालखीचं स्वागत केलं.

पुणे पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेसाठी विशेष बंदोबस्त करण्यात आला होता. संपूर्ण शहरात वारीनिमित्त भाविकांसाठी आरोग्य, पाणी आणि प्राथमिक सुविधा देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. वारीच्या या सोहळ्याने पुन्हा एकदा माणुसकी, भक्ती आणि एकतेचा संदेश दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT