Tukaram Maharaj Palkhi Sohala 2025 Saam TV
Video

Sant Tukaram Palkhi : तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज यवतमध्ये मुक्काम |VIDEO

Tukaram Maharaj Palkhi Sohala 2025: लोणी काळभोरमध्ये तुकोबांच्या पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे. महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज यवतमध्ये आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माऊली माऊलीचा जयघोष, 'ज्ञानोबा माऊली-तुकाराम' अशा मंत्रमुग्ध करणाऱ्या नामघोषात संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर रस्त्याने मार्गक्रमण करत लोणी काळभोर येथे काल सायंकाळी पोहोचली. पालखी सोहळ्याच श्रद्धेने आणि भक्तिभावाने स्वागत करत लोणी काळभोरवासीयांनी पाहुणचार केला आहे.

देहुहून प्रस्थान केल्यानंतर पालखी दोन दिवस पुण्यात मुक्कामाला होती. त्यानंतर पालखी सोलापूर महामार्गाने पुढे निघाली असून, आजचा मुक्काम यवत येथे असणार आहे. पालखी सोहळ्या सोबत मोठ्या संख्येने वारकरी भक्त सहभागी झाले असून, अभंगवाणी आणि टाळ मृदंगाच्या गजरात वातावरण भक्तीमय झाले आहे.

प्रशासनाच्यावतीने सोहळ्याच्या मार्गावर आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली असून, पोलीस बंदोबस्तही कडक ठेवण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत पालखी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करणार असून, लाखो भाविकांच्या उपस्थितीत विठुरायाच्या चरणी समर्पित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT