jalgaon news  saam tv
Video

Ashadhi Wari: विठू नामाच्या गजरात श्री.संत मुक्ताई पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान|VIDEO

Sant Muktai Palakhi Yatra: आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्याने आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले आहे.

Omkar Sonawane

जळगाव: आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्याने आज पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. पालखी सोहळा कोथळी, मुक्ताईनगरातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. पालखी सोहळा प्रस्थान करतेवेळी हरिनामाच्या जयघोषाने अवघी मुक्ताईनगरी दुमदुमली होती. दरम्यान, परंपरेनुसार जुन्या मंदिरातून पालखी निघाली.

वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत मुक्ताईच्या पादुका पंढरपूरला ३३ दिवसांचा ७५० किलोमीटरचा पायी प्रवास तसेच वारी दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान ज्या संतश्रेष्ठ माऊलीच्या दिंडीला दिला जातो, त्या संत मुक्ताईंच्या दिंडीला तीन शतकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथील संत मुक्ताई संस्थानाच्या वतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात येते. दिंडीचे यावर्षीचे हे ३१६ वे वर्ष होते. आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वरांची दिंडी, देहूतून निघणारी संत तुकोबांच्या दिंडी एवढेच महत्त्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT