Sanjay Raut delivers a powerful speech at the Shetkari Kamgar Paksha anniversary event in Panvel, urging for unity among all Marathi leaders. Saam Tv
Video

राज-उद्धव एकत्र येऊन चालणार नाही...; संजय राऊत नेमकं काय बोलून गेले? पाहा व्हिडिओ

Sanjay Raut Speechशेतकरी कामगार पक्षाच्या कार्यक्रमात संजय राऊतांनी राज-उद्धव एकत्र येणं पुरेसं नाही, असं स्पष्ट सांगत सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. पुढील लढाई मोठी आहे, त्यासाठी सज्ज राहा, असं ते म्हणाले.

Omkar Sonawane

शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पनवेलमध्ये आयोजित कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार भाषण करत सत्ताधाऱ्यांवर घणाघात केला. शेतकरी आणि कामगार यांच्यासाठी संघर्ष करणे ही आमची परंपरा आहे. आम्ही एकत्र आलो आहोत, ही शेकापच्या पुण्याईच, असे म्हणत त्यांनी ऐक्याचे महत्त्व अधोरेखित केले.

मनसे प्रमुख राज ठाकरे, शशिकांत शिंदे आणि आम्हीही येथे आलो आहोत. हे सगळे एकत्र येणं हेच आमच्या एकतेचं आणि संघर्षाचं प्रतिक आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी शेतकरी-कामगार चळवळीतील नेत्यांचे योगदान स्मरण करत म्हणाले, हे फोटो नाहीत, आमचे हिरो होते. आम्ही तुमच्याकडून खूप शिकलोय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले हे आनंदाचं आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपले सगळे पक्ष एकत्र येणं गरजेचं आहे. कारण पुढची लढाई मोठी आहे आणि त्यासाठी सज्ज राहिलं पाहिजे.

दिल्लीतील राजकारणात २५ वर्षे अनुभव सांगताना राऊत यांनी सांगितलं, मराठी माणूस लढणारा आहे. उद्योग वाढले तरी नोकऱ्या मराठी माणसाला मिळाल्या पाहिजेत. हे काम जयंत पाटील आणि तुमचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे–अहिल्यानगर महामार्गावर पाणीच पाणी; वाहतूकदारांची वाहना चालवताना तारांबळ

Pune Rain: पुण्यात धडकी भरवणारा पाऊस, एका तासात रस्त्यांची झाली नदी; पुणेकरांचे प्रचंड हाल, पाहा VIDEO

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाईन आहात; मित्रांनाही कळणार नाही, करा 'ही' एक सेटिंग

Santosh Juvekar: हिंदी नाटकानंतर संतोष जुवेकर लवकरच झळकणार नव्या चित्रपटात; साकारणार ही महत्वाची भूमिका

Tulja Bhawani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात एआय कॅमेरे; नवरात्रोत्सवात होणार प्रथमच वापर

SCROLL FOR NEXT