Shiv Sena (Thackeray faction) and MNS protest in Nashik as Sanjay Raut targets BJP over crime and Rahul Dhotre murder case. Saam Tv
Video

Sanjay Raut: कुठं लपलाय तो उद्धव निमसे? भाजपवर संजय राऊतांचा घणाघाती हल्लाबोल; राज्यकर्ते नालायक|VIDEO

BJP Government Under Fire For Law And Order Failure In Nashik: नाशिकमध्ये ठाकरे गट आणि मनसेच्या जनआक्रोश मोर्चात खासदार संजय राऊत यांनी राहुल धोत्रे हत्याकांड, उद्धव निमसे फरार आणि नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

Omkar Sonawane

नाशिकमध्ये आज शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मनसेचे प्रमुख नेते उपस्थित असून यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवत नाशिकच्या समस्यांची जंत्रीच वाचली. मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये खुलेआम ड्रग्ज विकले जात आहे, आणि वाढत्या गुन्हेगारीने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शहरातील नांदुर नाका परिसरात राहुल धोत्रेचा भर दुपारी खून झाला होता. या हत्येचा मुख्य आरोपी उद्धव (बाबा) निमसे अद्यापही पोलिसांना गुंगारा देतोय. यावरूनच हायकोर्टाने नाशिक पोलिसांवर ताशेरे ओढले. यावरूनच संजय राऊत म्हणाले, हा निमसे अजूनही पोलिसांना सापडत नाही कसा सापडत नाही? आमचे कार्यकर्ते बरं सापडता. तो फरार असताना गिरीश महाजनांना बंगल्यावर जाऊन भेटतो. निमसे कोणत्या सरकारी बंगल्यात जाऊन लपला आहे? जर गृहमंत्री तुम्हाला हा निमसे सापडत नसेल तर तुम्ही राज्य करायला नालायक आहात असा जोरदार प्रहार संजय राऊत यांनी भाजपवर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : ९ मुले, तिघे विवाहित; नातवंडांशी खेळण्याच्या वयात महिला २० वर्षे लहान बॉयफ्रेंडसोबत पळाली

Maharashtra Live News Update: अमरावती महामार्गावरील बोले पेट्रोल पंप चौक ते विद्यापीठ कॅम्पस चौकपर्यंतच्या उड्डाण पुलाचे लोकार्पण होणार

Supreme court : सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका; राजकीय पक्षांच्या नोंदणीवरून घेतला महत्वाचा निर्णय

Nepal Protest: नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसवर आंदोलकांचा हल्ला; अनेकजण जखमी

Shocking: घराजवळच्या तलावात आढळला काँग्रेस नेत्याचा मृतदेह, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT