Sanjay Raut Saam TV
Video

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Sanjay Raut : मराठी विजयी मेळ्याव्याच्या कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्याकरिता ठाकरे शिवसेना गटाचे नेते संजय राऊत आणि मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन हे दोघे ही उपस्थित होते.पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांनी एकमेकांची गळाभेट घेतल्याचे दृश्य दिसून आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

त्रिभाषा धोरणाविरोधातील यशानंतर आज वरळी डोममध्ये होणाऱ्या विजयी मेळाव्यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेना नेते संजय राऊत यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली आहे. यावेळी मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन हेही उपस्थित होते.पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि सौहार्दपूर्ण वातावरण पाहायला मिळालं.दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र व्यासपीठावर येणार असल्यामुळे या मेळाव्याची तयारी जोरात सुरू असून, कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

संजय राऊतांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला आणि नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी आयोजकांकडून सर्व तयारी करण्यात आली आहे.कोणताही पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह न आणण्याचं आवाहनही करण्यात आलं असून, हा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण ठरण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दहशतवाद कधी थांबेल? भारत तुम्हाला...; पत्रकाराच्या प्रश्नावर पाक पंतप्रधान भडकले, उत्तर न देताच निघून गेले

GK: जगातील पहिली कागदी नोट कोणत्या देशाने बनवली? जाणून घ्या इतिहास

Today Gold Rate: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं महागलं; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Vastu Tips Of Camphor: घरात या ठिकाणी जाळा कापूर, वास्तुदोष होईल दूर, जाणून घ्या फायदे

Maharashtra Live News Update: पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट बंद

SCROLL FOR NEXT