Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut addressing the media while launching a sharp attack on Deputy CM Ajit Pawar over criminalisation of politics. Saam Tv
Video

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत राज्यातील सर्व गुंडांचा भरणा; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Sanjay Raut Attack On Ajit Pawar: पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत कुख्यात गुंडांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत शहरातील कुख्यात गुंड आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना उमेदवारी दिल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे शहरात आधीपासूनच कोयता गँग, भरदिवसा खून, चौकाचौकात हत्या यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे सावट असताना पुण्याच्या पालकमंत्र्यांनी थेट गुंडांना उमेदवारी देत एक प्रकारे त्यांना पोसत असल्याचे उघड झाले आहे. यावरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल चढवला आहे. महाराष्ट्रामध्ये असे वातावरण कधीच सुरू झाले नव्हते ते भारतीय जनता पक्ष, मिंदे आणि अजित पवारांनी सुरू केले आहे. राज्यातील सर्व गुंड हे अजित पवारांच्या पक्षात गेलेय. सगळे गुंड तुम्ही कोणत्याही गुंडाचे नाव घ्या आणि कोणत्याही गुंडांच्या टोळीचा संदर्भ द्या ते सगळे अजित पवारांच्या पक्षात आहे आणि हा पक्ष भाजपसोबत सत्तेमध्ये सामील आहे. अशा जोरदार शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT