Sanjay Raut on Gungi Gudiya controversy Saam TV
Video

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Gungi Gudiya controversy : 'गुंगी गुडीया' वादावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे असते तर त्यांनाही 'गुंगा गुड्डा' म्हटले गेले असते, असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे.

Namdeo Kumbhar

Sanjay Raut on Gungi Gudiya controversy : बीडच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगले. राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून घडामोडींवर त्यांचे लक्ष आहे, त्यामुळे या विषयावर भाष्य करणे अधिक योग्य ठरले असते. बीड जिल्ह्यामधील नेते धनंजय मुंडे हे त्यांच्या बाजूला बसले होते, आणि त्यांनी समोरच्या मायकचा ताबा घेतला व त्या पत्रकार परिषद गुंडाळून निघून गेल्या. सुनेत्रा वहिनींना जर कोणी 'गुंगी गुडीया' म्हटले असेल, आणि त्या जागी एखादा पुरुष मंत्री, एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस असते, तर त्यांना 'गुंगा गुड्डा' म्हटले गेले असते. राजकारणात असताना ही टीका सहन केली पाहिजे आणि चुका होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

इंदिरा गांधी यांनाही 'गुंगी गुडीया' म्हटले गेले होते, परंतु त्यांनी आपण स्वतंत्र विचारांच्या नेत्या आहोत हे सिद्ध करून दाखवले. सरकारमध्ये अनेक गुंगे-गुड्डे आहेत जे अडचणीच्या प्रश्नावर उत्तरे द्यायचे टाळतात, त्यामुळे यात स्त्री-पुरुष भेद करणे योग्य नाही. हा कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाचा अपमान नसून, घटनात्मक पदावर असताना संयमाने भाष्य करणे गरजेचे असते, असे संजय राऊत म्हणाले.

सुनेत्रा वहिनी यातून नक्कीच अनुभव घेतील आणि शिकतील. 'गुंगी गुडीया' हा शब्द असंसदीय नसून नेहमीचा वाक्प्रचार आहे. त्यांनी या विषयाकडे वैयक्तिक न पाहता उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने पाहिले पाहिजे, असेह राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT