Sanjay Raut alleges ₹50 crore spent on ‘Devabhau’ ads featuring Devendra Fadnavis with Shivaji Maharaj Saam Tv
Video

देवाभाऊंच्या 'त्या' जाहिरातींवर तब्बल 40 ते 50 कोटी खर्च; संजय राऊतांचा गंभीर आरोप|VIDEO

Sanjay Raut Alleges 50 Crore Black Money In Devendra Fadnavis Ads: संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या ‘देवाभाऊ’ जाहिरातींवर तब्बल 40 ते 50 कोटी खर्च झाला असून जाहिरातदाराचे नाव लपवण्यात आले आहे

Omkar Sonawane

मराठा आरक्षणाचा जीआर निघाल्यानंतर आता यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होताय. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले याचा जोरदार प्रचार आता भाजपचे नेते करत आहेत. तर दुसरीकडे शनिवारपासून राज्यभरातील सर्वच माध्यमांवर, फ्लेक्स आणि इतर माध्यमांतून देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर फुले वाहताना मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे. त्यावर फक्त 'देवाभाऊ' असा उल्लेख असल्याने आता नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

या संदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल केले. या जाहिरातींवर 40 ते 50 कोटींचा खर्च झाला आहे. त्या जाहिरातीत प्रकाशकाचे नाव नाही. ज्या व्यक्तीने जाहिराती दिल्या त्याने आपले नाव का लपवले, हे जनतेला कळायाला पाहिजे.

जाहिरातदाराचे नाव जाणीवपूर्वक लपवेल आहे. त्यामुळे हा सर्व काळा पैसा खर्च झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयातून कोणाला काही सूचना दिल्या होत्या का? याचा शोध घेतला पाहिजे असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी सरकारवर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अपात्र लाडकींनी लुटले 165 कोटी, 12 हजार पुरुषांचाही सरकारी तिजोरीवर डल्ला

भाजप नेत्याच्या मुलीचा भरदिवसा विनयभंग; दुचाकीस्वाराने कानशि‍लात लगावली, घटना CCTVत कैद

Maharashtra Live News Update: नागपुरात बारमध्ये तोडफोड केल्याची व्हिडिओ व्हायरल

डिझेल टँकर पेटला; आगीच्या ज्वाळा अन् धुराचे काळेकुट्ट लोट रस्त्यावर पसरत गेले...VIDEO

Bhumi Pednekar Photos: 'दम लगा के हैशा' फेम भूमीचा जलवा, काळ्या ड्रेसमधील फोटो झाले व्हायरल

SCROLL FOR NEXT