Vishwajeet Kadam On Poshan Aahar Saam Tv
Video

VIDEO: पोषण आहारात आढळले मृत सापाचे पिल्लू, दोषींवर कडक कारवाई होणार

Vishwajeet Kadam On Poshan Aahar: सांगलीच्या पलूसमधील कृषीनगरच्या ११६ नंबरच्या शाळेमध्ये पोषण आहाराचे वाटप करण्यात आले होते. या पोषण आहारामध्ये सापाचे मृत पिल्लू आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Priya More

सांगलीच्या पलूसमध्ये माता बाल पोषण आहारामध्ये मृत सापाचे पिल्लू आढळले आहे. साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर हा मुद्दा स्थानिक आमदार विश्वजीत कदम (MLA Vishwajeet Kadam) यांनी विधानसभेत उपस्थित केला. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी विश्वजीत कदम यांनी केली. गर्भवती महिला आणि लहान मुलांच्या आयुष्याशी आपण खेळतोय, असे मत विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले. विश्वजीत कदम यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर शासनाने याची अत्यंत गंभीर दखल घ्यावी. ही बाब गंभीर असून शासनाने याची नोंद घेऊन कडक कारवाई करावी, असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहे. सांगलीच्या पलूसमधील कृषीनगरच्या ११६ नंबरच्या शाळेमध्ये पोषण आहाराचे वाटप करण्यात आले होते. या पोषण आहारामध्ये सापाचे मृत पिल्लू आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad News: रायगडावर फिरण्यासाठी गेला, ८०० फूट खोल दरीत मृतदेह आढळला; मुंबईच्या तरुणासोबत काय घडलं?

Bullet Train: अबब! 12 मजली इमारती इतका उंच अन् 480 मीटर लांब; बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर उभारला भव्य पूल, काय आहे पुलाची खासियत? वाचा

Maharashtra News Live Update: ठाण्यातील पुर्णेकर हत्या प्रकरणावरून आता आगरी समाज आक्रमक

Copper Utensils : धनतेरसपूर्वी तांबे-पितळाची भांडी घेताय? शुद्धता ओळखण्यासाठी या ट्रिक येतील कामी

Rice Water Benefits for Skin : चेहऱ्यावर तांदळाचे पाणी लावल्याने होतात ‘हे’ 5 चमत्कारिक फायदे; काळे डाग अन् सुरकुत्या होतील गायब

SCROLL FOR NEXT