SaamTV Exit Poll 
Video

SaamTV Exit Poll: सांगलीचं मैदान भाजपनं मारलं; एकहाती सत्ता राहणार?

Sangli Saam TV Exit Poll: साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये सांगली महानगरपालिकेत भाजपचा स्पष्ट विजय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Bharat Jadhav

राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल उद्या म्हणजेच शुक्रावारी लागणार आहेत. त्याआधी महापालिकांच्या निकालांचे एक्झिट पोलसमोर आलेत.या धक्कादायक निकाल लागतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. राज्यातील इतर महानगरपालिकांप्रमाणे सांगली महापालिका खूप महत्त्वाची होती. या महापालिकेत कोणाची सत्ता येणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता त्याचे उत्तर एक्झिट पोलमध्ये मिळालंय. महापालिकेच्या ७८ जागांसाठी ३८१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महापालिकेची निवडणूक चौरंगी होत आहे. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), जनसुराज्य, शिंदेसेना स्वबळावर लढत आहे. तर काँग्रेस -राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने आघाडी केली होती. सांगलीची सत्ता मिळवण्यासाठी महायुतीमधील पक्ष स्वबळावर लढल्या. यात भाजपनं सरशी घेतल्याचं दिसत आहे. सर्वाधिक ३८ जागा मिळण्याचा अंदाज साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात येत आहे. दुसऱ्या नंबरवर अजित पवार गट असून त्यांना १० जागा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटीजमध्ये मीठ की साखर काय खाणे टाळावे?

Maharashtra News Live Update : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

shiv Sena Symbol Case : शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीचा आज फैसला? पाहा कोर्टात काय घडलं

बीड हादरले! अंगणवाडी सेविकेचा दुर्दैवी मृत्यू, पतीने मुलासमोरच पेट्रोल टाकून पेटवले, मृत्यूपूर्वी महिलेचा धक्कादायक खुलासा

Cricketer Death News: 781 विकेट्स घेण्याऱ्या दिग्गज खेळाडूचं निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT