Sameer Bhujbal News SaamTv
Video

VIDEO : नांदगावात समीर भुजबळ vs सुहास कांदे ? भुजबळांच्या उमेदवारीची मोठी अपडेट

Samir Bhujbal Vs Suhas Kande : समीर भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत शरद पवार यांनी ठाकरे गटाला प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे समीर भुजबळ हे सुहास कांदे यांच्या विरोधात उभे राहणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Saam Tv

छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांना ठाकरे गटात घेऊन नांदगावमध्ये उमेदवारी द्या असा प्रस्ताव शरद पवार गटाचा उद्धव ठाकरेंकडे मांडला आहे.

समीर भुजबळ हे नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आग्रही आहेत. मात्र महायुतीकडून ही जागा सुहास कांदे यांना देण्यात आली आहे. त्यामुळे आता समीर भुजबळ हे मविआमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे नाशिकमधील नांदगाव विधानसभा ठाकरे गटाला मिळणार असल्याने समीर भुजबळ यांना आपल्याकडे घेऊन मशालीवर उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव आता शरद पवार गटाने उद्धव ठाकरे यांच्या पुढे मांडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. समीर भुजबळ हे तुतारी हाती घेतील अशी चर्चा केली जात होती. मात्र नांदगावची जागा ठाकरे गटाला मिळत असल्याने समीर भुजबळ यांना ठाकरे गटाने घ्यावे अशी आग्रही मागणी पवार गटाकडून करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून नांदगाव विधानसभेसाठी गणेश धात्रक सध्या इच्छुक आहेत. आता यावर ठाकरे गटाकडून यावर काय भूमिका घेण्यात येते हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ravi Jadhav : दिवाळीच्या मुहूर्तावर रवी जाधव यांनी दिलं मोठं सरप्राइज; नवीन चित्रपटाची घोषणा, रिलीज डेट काय?

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Thane Fire : ठाण्यात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी 3 ठिकाणी आग, हिरानंदानी इस्टेटमध्ये ३१ मजल्यावर आगीचा भडका

BMC elections : मी मोदींचा भक्त, मुंबईवर भाजपचं कमळ फुलणारच, महेश कोठारे काय म्हणाले?

Fact Check : पंतप्रधान मोदी देणार 5 हजारांचं गिफ्ट? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT