Drunk Man and Wife Assault Traffic Policeman Saam Tv
Video

Sambhajinagar: नवरा- बायकोचा ट्रॅफिक पोलिसावर हल्ला, भररस्त्यात शिवीगाळ करत मारहाण; VIDEO व्हायरल

Drunk Man and Wife Assault Traffic Policeman: संभाजीनगरमध्ये ट्रॅफिक पोलिसाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. नवरा-बायकोने भररस्त्यात ट्रॅफिक पोलिसावर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅफिक पोलिसाला मारहाण करण्यात आल्याची धक्कागायक घटना घडली. एका दारुड्याने शिवीगाळ करत ट्रॅफिक पोलिसाला मारहाण केली. याप्रकरणी नवरा-बायकोविरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ मुरलीधर गिरी असं गुन्हा करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ट्रॅफिक पोलिस कर्मचारी संतोष खरात हे हायकोर्ट सिग्नलवर ड्युटी करत होते. त्यावेळी आरोपी सोमनाथ डिव्हायडर जवळून दुचाकी चालवत होता. वाहतुकीचे नियम मोडत असल्यामुळे ट्रॅफिक पोलिसाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने दारू प्यायली असल्याचे आढळून आले. ट्रॅफिक पोलिसाने चौकशी सुरू केल्यानंतर त्याने हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ सुरू केला. आरोपीने ट्रॅफिक पोलिसाला तुम्हाला दोन दिवसांत बघून घेतो अशी धमकीही दिली.

आरोपीने ट्रॅफिक पोलिस संतोष खरात यांच्या अंगावर हात उचलला. यावेळी त्याने बायकोला देखील बोलावून घेतले. बायको आल्यानंतर दोघांनी ट्रॅफिक पोलिसाशी वाद सुरू केला. शिवीगाळ करत हाणामारी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना चापट मारली. यावेळी दारूच्या नशेत असलेला आरोपी सोमनाथ रस्त्यावर जाऊन झोपला आणि त्याने वाहतुकीला आडथळा निर्माण केला. त्यानंतर ट्रॅफिक पोलिसाने नियंत्रण कक्षाला माहिती देऊन दामिनी पथक बोलावले. रस्त्याने जाणाऱ्यांनीही या नवरा-बायकोला समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिस आल्यानंतर त्या दोघांना ताब्यात घेतले गेले. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवी मुंबईतील बेलापूर येथील इन्कम टॅक्स कॉलनीत पाणी साचले; नागरिकांचे हाल

Rajmachi Landslide: मोठी बातमी! राजमा किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी दरड कोसळली; 100 पर्यटक अडकले

EPFO Update : EPFO ने बदलले नियम; आता UMANG अॅपवर मिळतील 'या' सुविधा

Navi Mumbai: पांडवकडा धबधब्यात दोन तरुण गेले वाहून; शोधकार्य सुरू

BJP Parliamentary Board: भाजपमध्ये भाकरी फिरणार; संसदीय मंडळात होणार लवकरच फेरबदल?

SCROLL FOR NEXT