Sambhajinagar SaamTv
Video

Sambhajinagar : गुजराती कंपनीकडून दीड हजार गुंतवणूकदारांची फसवणूक; संभाजीनगरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा उघड, पाहा Video

Sambhajinagar Scam : राज्यात टोरेस कंपनीचा घोटाळा सुरू असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आणखी एक मोठा घोटाळा उघड झाला आहे. गुजराती कंपनीने तब्बल दीड हजार गुंतवणूकदारांची कोटींची फसवणूक केली आहे.

Saam Tv

राज्यात टोरेस घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणुकीवर ३ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुजरातच्या क्विक स्टार्ट २४ ग्रुप कंपनीने दीड हजार गुंतवणूकदारांकडून ३५ कोटी रुपये उकळून कार्यालयाला कुलूप लावून फसवणूक केली असल्याचं समोर आलंय. एका वर्षासाठी एक लाख रुपये १० महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा तीन टक्के परतावा मिळेल. त्याचबरोबर परदेशात मोफत सहलीसाठी जाता येईल असे आमिष दाखवून सुमारे ८०० जणांना ३५ कोटी रुपयांचा गंडा घातला.

शहरातील जिन्सी पोलिस ठाण्यात कंपनीचे संचालक हर्षल गांधी, प्रतीक शहा यांच्यासह शाखा व्यवस्थापक शीतल सुधाकर मोतिंगे, विठ्ठल भागाजी तांदळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. शीतल सुधाकर मोतिंगे, विठ्ठल भागाजी तांदळे या दोघांना पोलिसांनी अटक केलीय. छत्रपती संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून याचा तपास सुरू आहे. मोठ्या हॉटेलमध्ये सेमिनार घेऊन  कंपनीत गुंतवणूक केल्यास महिना ३ टक्के परतावा देण्याचे आमिष गांधी व शहाने दाखवले होते. सुरुवातीच्या काळामध्ये दर महिन्याला गुंतवणूकदारांना त्यांना रक्कम मिळायची मात्र काही दिवसानंतर ती बंद झाली. पैसे मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदार घाबरले. त्यांनी कंपनीच्या मुख्य शाखेत धाव घेतली. तेव्हा शाखाच बंद आढळली. आरोपी शीतल व विठ्ठलने त्यांना पैसे देण्याचे आमिष दाखवून संपर्क बंद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT